Karan Deotale : नवीन महाराष्ट्र कसा असावा या उद्देशाने आजचा अर्थसंकल्प!

Bhairav Diwase

मुंबई:- येणाऱ्या नवीन पिढीसाठी महाराष्ट्राचे नवीन औद्योगिक धोरण 2025 जाहीर करण्यात आले. त्यामुळे नवीन रोजगारांची निर्मिती ही डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असे आमदार करण देवतळे म्हणाले.

आपल्या विदर्भातील गडचिरोली जिल्ह्याला स्टील हब म्हणून ओळखले जाणार ही एक आनंदाची बातमी आहे
नागपूर येथे अर्बन हार्ट केंद्राची स्थापना करण्याची योजना शासनाने आखली. नदी जोड प्रकल्प, जल शिवार अभियान, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, सिंचन सुधारणा कार्यक्रम, अकोला गडचिरोली येथे विमानतळाची पाहणी, मुंबई नागपूर पुणे येथील नागरिकांसाठी मेट्रोची सुविधा, समृद्धी महामार्गावर ऍग्रो लॉजिस्टिक हब उभारणार त्याचा फायदा विदर्भातील शेतकऱ्यांना होणार आहे.

एकंदरीत पाहिले तर सर्व जनतेचा तसेच राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्वपूर्ण अशा योजना शासनातर्फे राबविण्याची तयारी पुढील काळात उपयोगी ठरू शकते. या अर्थसंकल्प 2025 मध्ये अशाच काही योजना राबविण्याचे काम माझे शासन करणार आणि एक नवीन महाराष्ट्र ची संकल्पना प्रत्यक्षात उतरणार असेही आमदार करण देवतळे म्हणाले.