राजुरा:- आयपीएल सामन्यांवर ऑनलाईन जुगार खेळणाऱ्या चौघांना राजुरा पोलिसांनी कारवाई करीत अटक केली आहे. श्रषिक उर्फ सोनु धनराज चुनारकर, आवेश जावेद शेख, संजय श्रीरंग कोडापे व स्वप्नील लांडे (सर्व रा. राजुरा) असे आरोपींचे नाव आहेत. आरोपींकडून एक लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशात आयपीएल क्रिकेट सामने सुरू आहेत. याच आयपीएल क्रिकेट सामन्यांवर ऑनलाईन जुगार लावून आरोपी दामदुप्पटीने पैसा कमाई करीत आहेत. असाच प्रकार राजुरा येथे काल उघडकीस आला. राजुरा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे राजुरा येथे मुंबई इंडियन्स विरुध्द दिल्ली डेअर डेव्हिल्स दरम्यान होणारी आयपीएल २०२५ क्रिकेट मॅच वर चौघे जण ऑनलाईन सट्टा घेत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे राजुरा तालुक्यातील बामनवाडा येथील विहान रेस्टॉरंटचे मागे एमआयडीसी परिसरामध्ये जुगार खेळत असताना पोलिसांनी धाड टाकली.
यामध्ये आरोपी श्रषिक उर्फ सोनु धनराज चुनारकर, आवेश जावेद शेख, संजय श्रीरंग कोडापे व स्वप्नील लांडे (सर्व रा. राजुरा) आदी चौघे हे मुंबई इंडियन्स विरुध्द दिल्ली डेअर डेव्हिल्स दरम्यान होणारी आयपीएल २०२५ क्रिकेट मॅचवर मोबाईलवर ऑनलाईन सट्टा खेळत असताना आढळून आले. आरोपींविरुध्द राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून मोबाईलसह १ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनात परिविक्षाधिन सहा. पोलीस अधीक्षक तथा प्रभारी ठाणेदार अनिकेत हिरडे यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक भीष्मराज सोरते, हाके, सहायक फौजदार किशोर तुमराम, विक्की, शरद राठोड, महेश बोलगोडवार, शफीक शेख, आनंद मोरे, तिरुपती जाधव यांनी केली.