वरोरा:- विनापरवाना रेती वाहतुकीवर विभागाकडून महसूल सुरु असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर प्रणय गारघाटे या ट्रॅक्टर मालकाने गुरुवारी (दि. १९) सायंकाळी वडगाव गावाजवळील विहिरीत उडी घेतल्याची धक्कादायक घटना घडली.
अवैधरीत्या रेती वाहतूक होत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाल्यानंतर, बामर्डा - वडगाव रस्त्यावर एक विनापरवाना ट्रॅक्टर अडवले. ट्रॅक्टरमालक आणि चालकाकडे कागदपत्रे नसल्याचे आढळून आल्यानंतर कारवाई सुरू करण्यात आली. दरम्यान, भीतीने प्रणय गारघाटे याने जवळ असलेल्या विहिरीत उडी घेतली.
प्रणय गारघाटे याने विहिरीत उडी घेतल्याचे लक्षात येताच महसूल पथकातील अधिकारी आणि उपस्थित नागरिकांनी तत्काळ आरडाओरड केली. गावकऱ्यांनी धाव घेत विहिरीतून त्याला बाहेर काढले. यानंतर तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील चौकशी सुरू करण्यात आली.