Rajura Murder News: राजुरा हत्येने हादरले: महिलेची घरातच हत्या

Bhairav Diwase

राजुरा:- चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारी झपाट्याने वाढत असून जिल्ह्यातील राजुरा शहरात ५५ वर्षीय महिलेची अज्ञाताने धारदार शस्त्राने वार करीत हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. राजुरा शहरातील रमाबाईनगर वार्डात राहणाऱ्या ५५ वर्षीय कविता रायपूरे असे मृतकाचे नाव आहे.

मृतक कविता रायपुरे यांचा मुलगा सुरेश रायपुरे हा खाजगी संस्थेत सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. तो रात्रौ आठ वाजता आपल्या कामावर गेला होता. कविता रायपूरे ही घरात एकटीच होती. सदर मृतक महिला हि किराणा दुकान चालविते. १४ जून रोजी रात्री मृतक महिला हि घर एकटीच होती, घरा समोरील गेटला कुलूप लावून होते, आज (दिनांक 15 जून) ला सकाळी बाजूलाच राहणारी मुलगी ममता अलोणे हि दूध नेण्यासाठी घरी आली मात्र आईने प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे गेटचे कुलूप काढून दार ठोठावले तर दार उघडत नव्हते. खिडकीतून ममता ने बघितले तर कविता रायपुरे या बेडवर झोपलेल्या अवस्थेत होत्या. ममता ने आईला हाक मारली मात्र आईने प्रतिसाद दिला नाही. 

ममता ने आपल्या पतीला याबाबत सांगितले, अथक प्रयत्न करूनही कविता प्रतिसाद देत नसल्याने तुझी आई गेली असे ममताचा पती म्हणाला, याबाबत राजुरा पोलिसांना माहिती देण्यात आली, पोलिसांनी दरवाजा उघडत आत प्रवेश केला असता कविता रायपुरे रक्तबंबाळ अवस्थेत होत्या, मृतकाच्या कपाळाच्या वरच्या बाजूस डोक्याला धारधार वस्तूने मारल्याचे दिसत होते. चेहऱ्यावर, कपाळावर आणि छातीवर मार असल्याचे पोलिसांच्या निदर्शनात आले.

राजुरा पोलिसांनी घटनेचा पंचनामा करीत तपासाला सुरुवात केली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.