राजुरा:- घरासमोरील अंगणात कपडे वाळत घालताना विजेचा जोरदार धक्का बसून एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास चिंचोली (खुर्द) गावात घडली. सुवर्णा राजेश वांढरे (वय ४०) असे मृत महिलेचे नाव आहे.
सुवर्णा वांढरे या सकाळी रोजच्या प्रमाणे घरासमोर अंगणात कपडे वाळत घालत होती. दरम्यान, कपडे वाळवण्यासाठी लावलेल्या लोखंडी तारेला अचानक कटलेली सर्व्हिस केबल लागली. ही केबल विद्युत प्रवाहाने भरलेली असल्याने सुवर्णा यांना स्पर्श होताच जोरदार विजेचा करंट लागला. या घटनेत तिला घटनास्थळीच मृत्यू झाला.