पोंभूर्णा:- आगामी काळातील सण,उत्सव शांततेत पार पडावे.व शांतता,सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी दि.२५ ऑगस्टला पंचायत समितीच्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहात शांतता समितीची सभा पार पडली.
यावेळी उपविभागीय अधिकारी लघीमा तिवारी,तहसीलदार मोहनिश शेलवटकर,नगराध्यक्षा सुलभा पिपरे,गट विकास अधिकारी नमिता बांगर,पोंभूर्णा ठाणेदार राजकमल वाघमारे,उमरी पोतदार ठाणेदार ठेंगणे,नायाब तहसीलदार रामकृष्ण उईके,दिपाली आत्राम यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपविभागीय अधिकारी लघीमा तिवारी यांनी गणेशोत्सवा
दरम्यान प्रशासन अलर्ट राहिल.लेझर लाईटवर बंदी घातलेली आहे.डीजेच्या आवाजाची जी मर्यादा आहे त्यापेक्षा जास्त आवाज वाढवल्यास संबंधित मंडळावर कठोर कारवाई केली जाईल.गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणालाही त्रास होऊ नये,वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी.
यासाठी सर्व गणेश मंडळांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले.गणेश वित्सर्जन करण्यात येणाऱ्या घाटावर पथक तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
पोंभूर्ण्याचे ठाणेदार राजकमल वाघमारे यांनी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावांमधील गणेशोत्सव शांततेत साजरा करण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे.शांतता कमेटी व पोलिस पाटील,सर्व गणेश मंडळांची बैठक घेण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी सर्व विभागांचे प्रमुख व अधिकारी, शांतता समितीचे सदस्य,पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.