चंद्रपूर:- गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी सर्वत्र जोरदार तयारी सुरू असून चंद्रपूरमध्ये देखील गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. शहरातील धनराज मुनगेलवार यांच्या घरी यंदा गणेशोत्सवासाठी पर्यावरणपूरक सजावट करण्यात आली आहे.
मुनगेलवार यांच्या कुटुंबाने इको-फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला असून, घरातील खुशबू आणि मानसी यांनी खास कुड्याच्या पानांचा वापर करून बाप्पासाठी सुंदर आसन आणि सजावट तयार केली आहे. प्लास्टिक किंवा इतर कृत्रिम वस्तूंऐवजी नैसर्गिक पानांचा वापर करून ही सजावट करण्यात आल्याने ती पर्यावरणपूरक आणि आकर्षक दिसत आहे. या अनोख्या सजावटीमुळे हा गणपती पर्यावरण रक्षणाचा संदेश देत आहे.