Sp college Chandrapur: हिंदी दिवसानिमित्त 'विकसित भारत' विषयावर सरदार पटेल महाविद्यालयात पार पडली निबंध स्पर्धा

Bhairav Diwase

चंद्रपूर:- येथील सरदार पटेल महाविद्यालयात ‘ हिंदी दिवस’ निमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभाग व मेरा युवा भारत, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 'विकसित भारत' या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मेरा युवा भारत, चंद्रपूरचे जिल्हा समन्वयक ॲड. देवा पाचभाई, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, डॉ. कुलदीप आर. गोंड, डॉ. पुरुषोत्तम माहोरे, डॉ. निखिल देशमुख, डॉ. वंदना खनके महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या स्पर्धेचा उद्देश तरुणांमध्ये राष्ट्र उभारणीची भावना निर्माण करणे आणि हिंदी भाषेबद्दल त्यांचे आकलन आणि अभिव्यक्ती कौशल्य विकसित करणे होता.

या स्पर्धेत अनेक स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रम अब्दुल शफी सभागृहात करण्यात आला. या स्पर्धेत प्रबुद्ध गेडाम याने प्रथम क्रमांक, कु. वृक्षाली गेडाम हिने द्वितीय क्रमांक, तर गौरव झाडे याने तृतीय क्रमांक पटकाविला. या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. पुरुषोत्तम माहोरे आणि डॉ. निखिल देशमुख हे होते. बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्वोदय शिक्षण मंडळाचे सहसचिव डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित, चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. गोपाल मुंधडा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर, उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार, कला विभाग प्रमुख डॉ. सुनीता बनसोड, डॉ. शैलेंद्र शुक्ला, प्रा. चंद्रदेव खैरवार यांच्या हस्ते सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.


दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणाताई तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य, राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, चंद्रशेखर वाडेगावकर, जिनेश पटेल यांनी उपरोक्त उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या.