चंद्रपूर : जिल्हा बार असोसिएशन, चंद्रपूर येथील नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या नवनियुक्त कार्यकारणीचा पदग्रहण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. याप्रसंगी बार असोसिएशनच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमास ज्येष्ठ वकील, माजी पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने वकील बांधव उपस्थित होते.
या पदग्रहण सोहळ्यात अध्यक्ष ॲड. विक्रम टंडन, उपाध्यक्ष अमन मारेकर, सचिव ॲड. अभिजित किन्हीकर, सहसचिव ॲड. तृप्ती मांडवगडे, कोषाध्यक्ष ॲड. मुर्लीधर बावनकर तसेच ग्रंथपाल ॲड. राहुल थोरात यांनी आप-आपल्या पदांची अधिकृत सूत्रे स्वीकारली.
यासोबतच महिला राखीव गटातून सदस्य म्हणून ॲड. सरोज कदम, ॲड. राजलक्ष्मी रामटेके व ॲड. महेश्वरी सोनुले यांची निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून ॲड. सपना शेट्टी, ॲड. आकाश गिरी, ॲड. वर्षा उपाध्याय, ॲड. शरीफ मिर्जा, ॲड. स्वाती समर्थ, ॲड. तोषित किन्नाके, ॲड. सुरेश दुर्गम, ॲड. अमोल वैद्य, ॲड. मनोज मिश्रा, ॲड. रोशनी कांबळे, ॲड. सोपान जवंजार व ॲड. प्रतिभा येलेकर यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमात नवनियुक्त अध्यक्ष ॲड. विक्रम टंडन यांनी मनोगत व्यक्त करताना बार असोसिएशनच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करण्याचा संकल्प व्यक्त केला. वकिलांच्या सुविधा, ग्रंथालयाचा विकास, न्यायालयीन कामकाज अधिक गतिमान करणे तसेच तरुण व महिला वकिलांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
इतर पदाधिकाऱ्यांनीही मनोगत व्यक्त करत सर्व सदस्यांच्या सहकार्याने पारदर्शक व कार्यक्षम कारभार करण्याचा निर्धार व्यक्त केला. पदग्रहण सोहळ्याच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी नवनियुक्त कार्यकारिणीचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

