चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती २०२४-२५ प्रक्रियेसाठी जिल्ह्यात येणाऱ्या महिला उमेदवारांची गैरसोय टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष पाऊल उचलले आहे. भरतीसाठी येणाऱ्या सर्व महिला उमेदवारांच्या राहण्याची व्यवस्था तुकूम रोडवरील पोलीस फुटबॉल मैदानाजवळ असलेल्या 'महिला बॅरेक' येथे करण्यात आली आहे.
बाहेरगावाहून येणाऱ्या मुलींनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहिती किंवा मदतीसाठी खालील महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्याशी संपर्क साधता येईल:
- कल्पना महाजन (महिला पोलीस उपनिरीक्षक): ९९२३६८९५५७
- वंदना बोरसरे (महिला पोहवा): ९६७३८३९९७३
- मनधरना सोनकांबळे (महिला पो.अ.): ८९७५७७८१२४
चंद्रपूर जिल्ह्यात सध्या पोलीस भरतीची रणधुमाळी सुरू आहे. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी राज्यभरातून महिला उमेदवार चंद्रपुरात दाखल होत आहेत. या उमेदवारांची राहण्याची अडचण होऊ नये, यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने निवासाची मोफत व्यवस्था केली आहे.
चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती २०२४-२५ साठी येणाऱ्या महिला उमेदवारांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी तुकूम रोडवरील पोलीस फुटबॉल मैदानालगत असलेल्या महिला बॅरेकमध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत या बॅरेक्समध्ये आवश्यक त्या सोयीसुविधा पुरवण्यात आल्या आहेत.
या व्यवस्थेबाबत अधिक माहितीसाठी तीन महिला समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे. उमेदवार कल्पना महाजन, वंदना बोरसरे किंवा मनधरना सोनकांबळे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून माहिती मिळवू शकतात. भरती प्रक्रियेदरम्यान महिला उमेदवारांना कोणताही त्रास होऊ नये, हा यामागील मुख्य उद्देश आहे.

