Chandrapur police Bharti: ​चंद्रपुरात उद्यापासून खाकीसाठी रणधुमाळी!

Bhairav Diwase
११ फेब्रुवारीपासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात

चंद्रपूर:- दिनांक ११ फेब्रुवारी, २०२६ पासुन पोलीस मुख्यालय चंद्रपूर येथील कवायत मैदानावर पोलीस भरती २०२४-२५ ची प्रक्रिया सुरु होत असुन त्यात प्रथम शारिरीक मोजमाप, मैदानी चाचणी व त्यानंतर लेखी परिक्षा होणार आहे. शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणी करीता जिल्ह्यात पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांचे मार्गदर्शन व नेतृत्वाखाली १ पोलीस अधीक्षक, ४ पोलीस उपअधिक्षक, १८ पोलीस निरीक्षक, ४६ सपोनि/पोउपनि आणि ३३५ सफौ/पोहवा/पोअं महिला व पुरुष पोलीस अंमलदार यांचे सह १० पोलीस कवायत निदेशक आणि ३२ पोलीस व्हिडीओग्रॉफर अशा प्रकारे एकुण ६८ पोलीस अधिकारी व ३९१ पोलीस अंमलदार आणि ३७ मंत्रालयीन लिपीक वर्गीय कर्मचारीचा समावेश आहे.

चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई संवर्गातील एकुण २१५ पदासाठी संपुर्ण राज्यातुन १४६०७ पुरुष उमेदवार, ६०७४ महिला उमेदवार तर ०२ तृतीय पंथी उमेदवार असे एकुण २०६८३ आवेदन अर्ज प्राप्त झालेले आहे.


संपुर्ण पोलीस भरती प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शक पध्दतीने होणार असुन १०० मिटर, ८०० मिटर आणि १६०० मिटर धावण्याच्या चाचणीसाठी अत्याधुनिक RFID पध्दतीचा वापर होणार असुन तर उंची मोजमापसाठी सुध्दा अत्याधुनिक laser पध्दतीचा वापर होणार आहे. संपुर्ण प्रक्रिया वर सीसीटीव्ही कॅमेरा आणि व्हिडीओ कॅमेराची नजर राहणार असुन प्रत्येक ठिकाणी पुरेसा योग्य बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. त्याच प्रमाणे उमेदवारांसाठी प्रसाधन गृह आणि पिण्याचे पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.


तसेच बंदोबस्तामधील पोलीस अधिकारी व अंमलदार सदर पोलीस भरती प्रक्रिया मध्ये उमेदवार नसल्याबाबत खात्री करुन त्याबाबत हमी पत्र घेण्यात आलेले आहेत.


तरी, चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती करीता येणाऱ्या उमेदवारांनी कोणाच्याही आमिष व भुलथापाला बळी न पडता प्रमाणिकपणे भरती प्रक्रियेत सहभाग घेवुन उत्कृष्ट प्रदर्शन दाखवावे. तसेच कोणीही उमेदवार मादक पदार्थाचे सेवण करु नये. मादक व उत्तेजक पदार्थाचे सेवन केल्याचे आढळुन आल्यास कायदेशीर कारवाई देखील करण्यात येणार आहे.


ज्या उमेदवारांना चंद्रपूर येथे राहण्याची सोय नसल्यास, त्यांच्या राहण्याकरीता पुरुष बॅरेक, पोलीस फुटबॉल ग्रॉऊन्ड, तुकूम रोड चंद्रपूर येथे करण्यात आली आहे. सदर बाबत पोअं अजय गारघाटे मो. नं. 9420118492 आणि पोअं सतिश बगमारे मो. नं. 9325506620 यांचेशी संपर्क साधता येईल. राहण्याचे ठिकाणाचा लोकेशन अक्षांश-रेखांश 19.96839, 79.29695 असा आहे.