गडचिरोली:- पोलीस दलामार्फत चालक पोलीस शिपाई भरती प्रक्रिया २०२६) २७ जागांसाठी तसेच गडचिरोली पोलीस शिपाई भरती २०२४-२०२५ (प्रत्यक्ष भरती प्रक्रिया २०२६) ७१७ जागांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून सदर दोन्ही भरती करिता मैदानी (शारिरीक) चाचणीची तारीख जाहिर झालेली असून ती दिनांक ११/०२/२०२६ ते ०८/०३/२०२६ या कालावधीत गडचिरोली पोलीस मुख्यालयातील पटांगणावर आयोजित करण्यात आलेली आहे.
सविस्तर वृत्त असे की, २७ चालक पोलीस शिपाई पदाकरिता ३२९६ उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले असुन त्यापैकी २७९७ पुरुष उमेदवार व ४९९ महिला उमेदवार यांचे आहेत. तसेच पोलीस शिपाईच्या ७१७ पदाकरिता एकुण २३,७९१ उमेदवारांनी अर्ज सादर केले असुन त्यापैकी १६,३१० पुरुष उमेदवार व ७, ४८१ महिला उमेदवार यांचे आहेत. चालक पोलीस शिपाई पदाच्या एकुण २७ जागांपैकी अनुसुचित जाति ०३, अनुसुचित जमाति-०६, विज-(अ)-०१, भज (ब)-०१, भज (क)- ०१, भज (ड)-०१, विमाप्र-०१, इमाव-०५, एसईबीसी-०२, इडब्ल्युएस-०२, अराखीच-०४ अशा स्वरुपात पदभरती घेण्यात येणार असून ती दि.११/०२/२०२६ ते १३/०२/२०२६ या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे.
यासोबतच पोलीस शिपाई पदाच्या एकुण ७१७ जागांपैकी अनुसुचित जाती-८४, अनुसुचित जमाति-९२, विज (अ)-०८, भज (ब)-०८, भज (क) ०८, भज (ड)-१५, विमाप्र ०८, इमाव-१२१, एसईबीसी-५८, इडब्ल्युएस-५८, अराखीव-२५७ अशा स्वरुपात पदभरती घेण्यात येणार असुन ती दि.१४/०२/२०२६ ते ०७/०३/२०२६ या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे. सदर भरती प्रक्रीयेदरम्यान दि. ११/०२/२०२६ रोजी पहिल्या दिवशी १३०० उमेदवारांची व त्यानंतर दरदिवशी सरासरी १५०० उमेदवारांची शारिरिक (मैदानी) चाचणी घेण्यात येणार आहे. सर्व उमेदवारांना पोलीस शिपाई व चालक पोलीस शिपाई पदाच्या मैदानी (शारिरीक) चाचणी परीक्षेचे प्रवेशपत्र हे महाआयटी विभागामार्फत ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करण्यास उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तरी, सर्व उमेदवारांनी आपले मैदानी (शारिरीक) चाचणी परीक्षेचे प्रवेशपत्र https://policerecruitment2024.mahait.org या वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन घ्यावे तसेच प्रवेशपत्रावर नमूद असलेल्या मैदानी (शारिरीक) चाचणी परिक्षेची तारीख लक्षात घेऊन मैदानी (शारिरीक) चाचणी करीता आवश्यक कागदपत्रासह पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे हजर राहणेबाबत गडचिरोली पोलीस दलामार्फत कळविण्यात येत आहे.
सदर पदभरती प्रक्रिया ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन पुर्णपणे पारदर्शक पध्दतीने करण्यात येणार असून यामध्ये उमेदवारांची छाती-उंची या शारीरीक मोजणीकरीता पीएसटी (PST) Digital Physical Standard Test तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. तसेच उमेदवारांची १६०० मी. धावणे (पुरुष), ८०० मी. धावणे (महिला), १०० मी. धावणे (पुरुष व महिला) च्या चाचणी करीता (RFID) Based Technology चा वापर करण्यात येणार आहे. यासोबतच गोळा फेक चाचणीकरीता Prism Technology आधारित तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. मैदानी (शारिरीक) चाचणीमध्ये उत्तीर्ण होवुन लेखीपरीक्षेकरीता पात्र उमेदवारांची बायोमॅट्रीक पध्दतीने हजेरी घेवुन पडताळणी करण्यात येणार आहे. जर पावसामुळे एखादे दिवशी मैदानी चाचणी होवुन शकली नाही तर त्यांना पुढची सुयोग्य तारीख दिली जाईल. सोबतच काही उमेदवारांना वेगवेगळया पदाकरीता एकापेक्षा जास्त ठिकाणी आणि एकाच दिवशी मैदानी चाचणी करीता हजर राहण्याची सुचना प्राप्त झाली अशा उमेदवारांना दुसरी तारीख दिली जाईल. उमेदवारांना इतर काही अडचणी आल्यास त्याचे निरसन स्थानिक पातळीवर करण्यात येईल. सदर पदभरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांनी कोणत्याही गैरमार्गाचा वापर करु नये, असे करतांना आढळुन आल्यास उमेदवाराची उमेदवारी तात्काळ रद्द करुन त्याचेवर प्रचलित कायद्यान्वये योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. उमेदवारांनी कुठल्याही प्रलोभन किंवा आमिषाला बळी पडू नये तसेच कोणीही आमिष किंवा प्रलोभन देत असेल तर पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथील समाधान कक्ष, दुरध्वनी क्र.८८०६३१२१०० यावर तसेच उपविभागीय कार्यालय/पोस्टे/उपपोस्टे/पोमकें येथे माहिती द्यावी.

