Gadchiroli News: एसटी बसचा भीषण अपघात; ७ महिन्यांच्या चिमुकल्यासह तिघांचा दुर्दैवी मृत्यू!

Bhairav Diwase


गडचिरोली:- गडचिरोलीहून उमरखेडकडे निघालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला आज सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास मोठा अपघात झाला आहे. या भीषण अपघातात एका ७ महिन्यांच्या निष्पाप चिमुकल्यासह तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तब्बल ३३ प्रवासी जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळाची बस क्रमांक 'एमएच १४ बीटी ०७४०' ही गडचिरोलीवरून यवतमाळमधील उमरखेडकडे चालली होती. चंद्रपूर मार्गावरील नवेगाव-मुरखळा परिसराजवळ पोहोचताच चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगात असलेल्या या बसने रस्त्याशेजारील लोखंडी कठडा तोडला आणि थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात जाऊन उलटली. अपघात इतका भीषण होता की बसमधील प्रवाशांमध्ये एकच आक्रोश निर्माण झाला.

या दुर्घटनेत देसाईगंजचे रहिवासी ख्वाजा शाहबुद्दीन (वय ६० वर्षे) आणि नवरगावच्या रहिवासी लक्ष्मीबाई दुरकीवार (वय ५५ वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला. तर, ७ महिन्यांचा चिमुकला शिवांश नवघरे हा गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान या चिमुकल्याची प्राणज्योत मालवली. या अपघातात इतर ३३ प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात आणि मृतकांच्या नातेवाईकांवर शोककळा पसरली असून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. चालकाचा ताबा सुटल्यानेच हा अपघात झाल्याचे प्राथमिक दर्शनी समोर येत आहे. या