Abhijeet Dipke Jantar Mantar : धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार

Bhairav Diwase

नवी दिल्ली:- कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तरुणांचं आंदोलन मोदी सरकार देखील गांभीर्याने घेताना दिसत आहे. या आंदोलनादरम्यान नवी दिल्लीत मध्यरात्री मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या.


नवी दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात सोनम वांगचुक यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत 26 दिवसांनी उपोषण सोडलं. सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतर अभिजीत दीपके यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतरही आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.


अभिजीत दीपके यांनी 'एक्स'वर पोस्ट करत भूमिका स्पष्ट केली. अभिजीत दीपके यांनी म्हटलं की, सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीचं शांततापूर्ण मार्गाने सुरू राहील. केंद्रीय शिक्षणमंत्री राजीनामा देत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील.'. त्यामुळे वांगचुक यांचं उपोषण संपुष्टात आल्यानंतरही कॉक्रोच जनता पक्षाचं आंदोलन सुरू राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.