Rajura Accident News: कंटेनरच्या चाकाखाली चिरडून २८ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू!

Bhairav Diwase
राजुरा:- राजुरा रोडवर आज संध्याकाळच्या सुमारास झालेल्या एका रस्ते अपघातात एका २८ वर्षीय तरूणाला आपला जीव गमवावा लागला आहे. विशाल जिवतोडे असं या मृत तरूणाचे नाव असून, या अपघातामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन येथील रहिवासी असलेला २८ वर्षीय विशाल जिवतोडे हा आज संध्याकाळी आपल्या दुचाकीने राजुरा रोडवरून जात होता. यादरम्यान राम मंदिरासमोर एका भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने विशालची दुचाकी थेट कंटेनरच्या मागील चाकाखाली आली. अपघात इतका भीषण आणि थरारक होता की, कंटेनरचे अवजड चाक थेट विशालच्या डोक्यावरून गेले. यामध्ये विशालचा जागीच मृत्यू झाला.


विशाल जिवतोडे हा अवघ्या २८ वर्षांचा होता. त्याच्या या अचानक आणि अत्यंत भीषण निधनामुळे जिवतोडे कुटुंबाचा मुख्य आधार हरपला असून, संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपासासाठी पाठवला आहे. पुढील तपास राजुरा पोलीस करत आहेत.