चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात मानवी आणि वन्यजीव संघर्ष काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीये. सावली वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या व्याहाड उपक्षेत्रातील उपरी नियतक्षेत्रात वाघाने केलेल्या हल्ल्यात एका ६८ वर्षीय गुराख्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
दिनांक १६ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मृताचे नाव वासुदेव लक्ष्मण वाकुडकर (वय ६८ वर्षे, रा. नील सनी पेटगाव) असे असून ते नेहमीप्रमाणे जनावरांसोबत जंगलात गेले होते. दरम्यान, दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात वासुदेव वाकुडकर यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.
