नागपूर:- नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राजकीय वातावरण चांगलंच तापू लागलं आहे. काँग्रेस पक्षाने या निवडणुकीसाठी आपला उमेदवार अधिकृतपणे जाहीर केला असून, विद्यमान आमदार अभिजित वंजारी यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे.
नागपूर पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसने अभिजित वंजारी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर, त्यांनी तात्काळ प्रचाराला सुरुवात केली आहे. मतदारसंघात त्यांचे संपर्क दौरे आणि पदवीधर मतदारांच्या गाठीभेटी तीव्र झाल्या आहेत.
विशेष म्हणजे, येत्या ५ ऑक्टोबर रोजी अभिजित वंजारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या अर्ज भरण्याच्या महत्वपूर्ण वेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी सिरिवेल्ला प्रसाद आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

