अर्धा लिटरच्या पॅालीथिन पॉकेटचा साठा संपल्याने निर्णय.
दूध वितरक व ग्राहकांनी नोंद घेण्याचे आवाहन.
Bhairav Diwase. July 23, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- शासकीय दूध योजना, चंद्रपूर येथील अर्धा लिटरच्या पॅालीथिन फिल्मचा साठा संपुष्टात आल्याने अर्धा लिटरच्या पॅालीफिल्मचा साठा उपलब्ध होईपर्यंत दिनांक 23 जुलै 2020 पासून एक लिटरच्या पॅालीफिल्म मधून अर्धा लिटर पाश्चराईज्ड व होमोनाईज्ड टोन्ड दुधाचा पुरवठा करण्यात येईल.
अर्धा लिटर दुधाच्या पॉकिटाची किंमत 18 रु. तर एक लिटर दुधाच्या पॉकिटाची किंमत 36 रु. राहील. तरी सर्व संबंधित शासकीय दूध वितरकांनी व ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन दुग्धशाळा व्यवस्थापक शासकीय दूध योजना, चंद्रपुर यांनी केले आहे.