(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- भारताचे ऐतिहासिक निर्णय घेणारे पोलाद पुरुष सन्माननीय पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त साप्ताहिक कार्यक्रमाअंतर्गत मा. आमदार श्री.सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात तसेच मा.देवराव भाऊ भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज. दि.१८/९/२०२० ला लोकसेवा मंगल कार्यालय पडोली भारतीय जनता पार्टी तसेच भारतीय जनता युवा मोर्चा व महिला आघाडी भाजपा तालुका चंद्रपूर च्या वतीने रक्तदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री देवराव भाऊ भोंगळे जिल्हाध्यक्ष भाजपा हे होते.या कार्यक्रमात पुरुष व महिला यांन रक्तदान केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता श्री.नामदेव डाहुले तालुका अध्यक्ष भाजपा, श्री.अनिल डोंगरे तालुका अध्यक्ष भा.ज.युं.मो, श्री.विजय आगरे महामंत्री भाजपा, श्री. रंजीत सोयाम जि.प. सदस्य, श्री.अजय चालेकर, श्री.विनोद खडसे. सौ.दुर्गा बावणे, सौ.कुसुमताई टेकाम, श्री.सुशांत शर्मा. श्री.आशीष वाढई. श्री.महेश कोलावार. श्री.नागेश निखाडे, सौ. अन्नुजी ठेंगणे, सौ. कल्पना घुने इत्यादीने परिश्रम घेतले.