भाजपने केली काळ्या जीआर ची होळी.
Bhairav Diwase. Sep 18, 2020
नागपुर:- पूर्व विदर्भात काही दिवसांपूर्वी आलेल्या महापूरामुळे मोठं नुकसान झाले. नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपुर आणि गडचिरोली जिल्ह्यात महापुरामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी सरकारने जीआर काढला, ‘पण हा काळा जीआर आहे, या जीआरनुसार फक्त साडेसहा हजार रुपये हेक्टरी शेतकऱ्यांना मिळणार आहे, ही पूरग्रस्तांची थट्टा असल्याचं
सांगत’ भाजपचे प्रदेश सरचीटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी या जीआरची होळी केली. पुरग्रस्तांसाठी काढलेल्या सरकारी जीआरची होळी करत, भाजपने राज्य सरकारचा निषेध केला. यावेळी भाजपचे प्रदेश सरचीटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्त्वात विभागीय आयुक्तांना निवेदनंही देण्यात आलं.
या जीआरद्वारे सरकारने पुरग्रस्तांच्या तोंडाला पानं पुसली, हा जीआर मागे घेऊन सरकारनं हेक्टरी ५० हजारांची मदत करावी, अशी मागणी यावेळी बावनकुळे यांनी केलीय. त्यांच्यासोबत
भाजपचे आ. गिरीश व्यास आणि आ. समिर मेघे उपस्थित होते.