Click Here...👇👇👇

सावली तालुका राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे थाळी वाजवा आंदोलन.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Oct 08, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) धनराज कोहळे रैयतवारी (जांब), सावली
सावली:- दि8/10/2020 ला सावली तालुका राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे वतीने संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी घंटा नाद आंदोलनाव्दारे ओबीसी समाजाच्या विविध समस्या शासन दरबारी निकाली काढण्याकरिता मा तहसिलदार सावली यांना निवेदन देण्यात आले 
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्य डॉ बबनराव तायवाडे,मा खुशालराव बोपचे, डॉ अशोक जिवतोडे श्री सचिन राजूरकर यांचे नेतृत्वात अनेक वर्षापासून कार्य सुरु आहे. ओबीसीचा मराठ्यांच्या आरक्षणाला कोणताही विरोध नाहीं. परंतु मराठ्यांना ओबीसी प्रवर्गात आरक्षण देऊ नये व इतरही खलील मागण्याचे निवेदन देण्यात आले,   

1.ओबीसी समाजाच्या प्रामुख्याने राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्याकडे प्रस्तावित करणाऱ्या मागण्या मांडल्या या मध्ये ओबीसी समाजाची 2021 मध्ये होऊ घातलेली जातिनिहाय जनगणना केंद्र सरकार करीत नसेल तर महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यात जातनिहाय जनगणना करून ओबीसी समाजात न्याय द्यावा. 

2. ओबीसी समाजाला मिळत असलेल्या 19 टक्के आरक्षणातून मराठा समाजास कोणतेही आरक्षण देण्यात येऊ नये.

3. ज्या जिल्ह्यांमध्ये ओबीसींना 6, 11, 14 , 9 टक्के वर्ग तीन व चार पदा करीता आरक्षण आहे अशा जिल्ह्यात ओबीसींना 19 टक्के आरक्षण देण्यात यावे.

4. 100% बिंदूनामावली केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार त्वरित सुधारित करण्यात यावी.

5. ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू करण्यात यावे.

6. महाज्योती करिता एक हजार कोटी रुपयांची लवकरात लवकर तरतूद करण्यात यावी.

7. ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला 1000 कोटी रुपये मंजूर करण्यात यावे.

8. ओबीसी समाजाचा एक लाख रिक्त पदाचा अनुशेष भरण्यात यावा.

9. ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करण्यात यावे.

10. ओबीसी समाजासाठी घरकुल योजना सुरू करण्यात यावी.

11. ओबीसी शेतकरी शेतमजुरांना वयाच्या 60 वर्षानंतर पेन्शन योजना लागू करण्यात यावी.

12. एसी, एसटी प्रमाणे ओबीसी शेतकऱ्यांना 100% सवलती वर राज्यात योजना सुरू करण्यात यावी.

13. एससी-एसटी प्रमाणे सर्व अभ्यासक्रमास शंभर टक्के शिष्यवृत्ती लागू करण्यात यावी.

14. ओबीसी विद्यार्थ्यांना स्वाधार योजना लागू करण्यात यावी.

15. महात्मा फुले समग्र वांग्मय 10 रुपये किमतीत उपलब्ध करून देण्यात यावे.

16. राज्याच्या प्रत्येक तालुक्यात विद्यार्थ्यांसाठी वाचनालय सुरू करण्यात यावे.

17. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात ओबीसी वि

18. भागीय कार्यालय सुरु करण्यात यावी, वरील सर्व मागण्याचे निवेदन देण्यात आले .

याप्रसंगी सर्व समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.श्री कवींद्र रोहणकर अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ सावली,श्री दिनेश पाटील चिटनूरवार तालुका समन्वयक ओबीसी महासंघ सावली,भाऊराव कोठारे सचिव राष्ट्रीय ओबीसी महासंघ सावली,हिवराज पा शेरकी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, विजय कोरेवार सभापती पंचायत समिती सावली,मनिषाताई जवादे पंचायत समिती सदस्या, उषाताई भोयर,प्रतिभाताई बोबाटे,अर्जुनजी भोयर,दिपकजी जवादे,तुळशीदासजी भुरसे,पूनम झाडे,सदाशिव बोबाटे,केशव भरडकर, अनिल मशाखेत्री,किशोर घोटेकर,गिरीश चिमुरकर, सूरज बोंम्मावार,तुळशीदासजी कुनघाडकर ,मनोहरजी कुकडे,कुशोर वाकूडकर,खुशाल बोदलकर,देवरावजी मुद्दमवार,राजेंद्र भोयर,जितेश सोनटक्के,कीनेकर सर,आशिष मनबतूनवार,मोतीराम चिमुरकर,पुरूषोत्तम मोहूर्ले,दिवाकर काचीनवार,धनराज डबले,अतुल लेनगुरे, संतोष नैताम,प्रकाश गद्यमवार, विनोद धोटे,खुशाल राऊत,नितीन गोहणे,नितेश रस्से,साईनाथ वाढई, यशवंत बरसागडे,मिथुन बाबनवाडे,प्रभाकर चौधरी,अंकुश भोपये,भूषण गुरनुले,,दिवाकर गेडाम, प्रवीण देशमुख ,ईश्वर गंडाटे आदी ओबीसी समाजाचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते,