🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

प्रेमसंबंधातून प्रेयसी झाली गर्भवती.....

प्रियकराने केले असे काही कृत्य कि वाचून धक्का बसेल....
Bhairav Diwase.      Jan 30, 2021
चंद्रपूर:- दिवसेंदिवस महिलांना अत्याचार हे वाढतच आहे. अशीच एक घटना 26 जानेवारीच्या पूर्वसंध्येला तुकूम परिसरात राहणाऱ्या 19 वर्षीय मुलीला वेकोली परिसरातील निर्जन ठिकाणी एका युवकाने व त्याच्या मित्राने जबर मारहाण करीत त्या ठिकाणी सोडून फरार झाले. सदर मुलगी गंभीरपणे जखमी झाली असल्याने तिला सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. 29 जानेवारीला पीडित मुलगी शुद्धीवर येताच दुर्गापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार स्वप्नील धुळे यांनी पीडितेचे बयान घेत घटनेची माहिती घेतली. पीडितेला मारहाण करणारा 19 वर्षीय गौरव उर्फ आशिष पिंपळकर व त्याचा मित्र अखिलेश जाधव यांच नाव समोर आलं.


      आरोपी गौरव हा पीडितेचा प्रियकर असल्याचे निष्पन्न झाले असता ठाणेदार धुळे यांनी याप्रकरणी सखोल चौकशी करीत गौरव पिंपळकर व अखिलेश जाधव या दोन्ही आरोपींना तात्काळ अटक केली. मारहाणीच्या वेळी सदर तरूणी अडीच महिन्याची गर्भवती होती. प्रेमप्रकरणातून तिला दिवस गेले. सदर तरूण लग्नासाठी नकार देत असल्याने हा प्रकार घडला. गौरवने रागाच्या भरात पीडित मुलीला निर्जनस्थळी नेत मारहाण केली. दुर्गापूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे आरोपीना तात्काळ अटक करून त्यांचेवर 376, 324, 326 व कलम 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला . पुढील तपास पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक बावनकर करीत आहे.