🙏🙏


🟥
🟥✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

बसच्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी.

Bhairav Diwase.       Feb 07, 2021

सावली:- भरधाव एसटीने ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीररीत्या जखमी झाला. विशेष म्हणजे दुचाकी चालकाचा पाय पूर्णपणे कटून एसटीमध्ये अडकला‌. ही घटना शनिवारी (ता.६) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास चंद्रपूर-गडचिरोली मार्गावरील कमलाई महाविद्यालया समोर  घडली.

 
     नामदेव कावळे (वय ३५, रा. मुडझा , ब्रह्मपुरी) असे जखमी युवकाचे नाव आहे. मुडझा येथील नामदेव कावळे हे दुचाकीने व्याहाडमार्गे गडचिरोली येथे कामानिमित्त गेले होते. सायंकाळच्या सुमारास दुचाकीने गावाकडे परत येत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या एमएच ४० एन ९५७० क्रमांकाच्या भरधाव एसटीने ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा पाय पूर्णपणे कटून बसमध्ये फसला, गंभीर जखमी असलेल्या कावळे यांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहे.

Popular posts......लोकप्रिय पोस्ट ......

गडचिरोली -चंद्रपूर मार्गावर वैनगंगा नदीत प्रेमीयुगलांनी मारली उडी..... 

आनंदवन येथे डॉ.शीतल आमटे यांची आत्महत्या. 

चंद्रपूरांनो सावधान! 500 रु. तर मिळणार नाहीत, पण गंडा कितीचा बसेल सांगताही येणार नाही. 

राजुरा ब्रेकिंग न्यूज; राजु यादव हत्याकांडातील आरोपींना अटक.