जाणून घ्या नियमावली.
मुंबई:- वाढता कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी आता राज्यातील लॉकडाऊन पुन्हा वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ब्रेक दि चेन अंतर्गत राज्यात लागू करण्यात आलेले कडक निर्बंध १५ मेपर्यंत वाढविण्यात आले आहे. त्यानुसार येत्या १ मे रोजी सकाळी ७ वाजल्यापासून १५ मे रोजी सकाळी ५ वाजेपर्यंत राज्यात कडक निर्बंध कायम राहणार आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आणि उपाय म्हणून आपत्कालीन उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे राज्य सरकारने आपल्या आदेशांमध्ये नमूद केले आहे.
राज्यात येत्या १५ दिवस पुढील नियम लागू.....
1. सामान्यांना मुंबई लोकल प्रवास पूर्ण बंद.
2. सामान्यांसाठी मेट्रो, मोनो सेवाही बंद.
3. राज्यात जिल्हा बंदी लागू.
4. अत्यावश्यक कारणाशिवाय आंतरजिल्हा, आंतरराज्य प्रवासही बंद.
5. अनावश्यक कामासाठी प्रवास करण्यास, घराबाहेर पडण्यास सर्वसामान्यांना बंदी.
6. खासगी वाहतुकीला केवळ अत्यावश्यक कारणांसाठी परवानगी, खासगी वाहतूकदारांनी नियम मोडल्यास १० हजार दंड.
7. सार्वजनिक वाहतूक ५०% क्षमतेने चालणार.
8. अंत्यविधी, आजारपणासाठी प्रवासाची मुभा.
9. सरकारी कार्यालयांमध्ये १५% उपस्थिती.
10. अत्यावश्यक सेवेतील सर्व कार्यालये १५% कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू राहणार.
11. लग्न समारंभासाठी २५ जणांमध्ये फक्त २ तासांसाठी परवानगी.
12. लग्नाचे नियम मोडल्यास ५० हजार दंड भरावा लागणार.
13. बाहेरून येणाऱ्यांना १४ दिवस होम क्वारंटाईन होणे अनिवार्य.
14. होम क्वॉरंटाईन नागरिकांच्या हातावर शिक्का बंधनकारक.
15. कोरोनाबाधित रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणात पाठवणार.