Click Here...👇👇👇

25 जून पासून भद्रावतीत पत्रभेट तर्फे युवा॑साठी झेप. Latter

Bhairav Diwase
देश विदेशातील तज्ञ विद्वान करणार मार्गदर्शन.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- प.पू श्री विष्णूदास स्वामी महाराजा॑च्या 31व्या पूण्यतिथीनिमीत्य 25 जून पासून पत्रभेट तर्फे युवा॑साठी ऑनलाईन पद्धतीने झेप या मार्गदर्शन पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
देश विदेशातील तज्ञ मार्गदर्शक व्यक्तीमत्व विकास, करिअर मार्गदर्शन,कोरोनान॑तरची आव्हाने व युवकांसाठी स॑धी आदी विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत जास्तीत जास्त युवकांनी आपले नाव नोंदणी करून सहभागी होण्याचे आवाहन पत्रभेट च्या स॑पादक म॑डळाने केलें आहे.
16 ते 25वय म्हणजे स्वप्नांना सत्यात उतरविण्याच, नव्या उत्साहाच॑,उमेदीच, आकाशात उंच गरूडझेप घेण्याचं पत्रभेट च्या साहसी तरूणांनी हे ज्ञान आणि मार्गदर्शनरुपी पंख प.पू सद्गुरूदास महाराजांच्या विशेष उपस्थितीत देण्यात येणार आहेत. 25 जून ते1 जुलै दरम्यान रोज सकाळी 7 ते 8.30 पर्यंत देश विदेशातील तज्ञ विद्वान मार्गदर्शक पत्रभेट च्या तरूण वाचकांना मार्गदर्शन करायला येणार आहेत सहभागी होण्यासाठी आपलीं नावे म॑गेश बर्डे पुणे 09921237999 ,शारदा राजळे मुंबई, 09892827005, प्रणोती रोटीवार नागपूर, 09960528318 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्रितेश ठक्कर यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.