मानवाधिकार सहायता स॑स्थान च॑द्रपूर जिल्हा कार्यकारिणी ची पहिली बैठक संपन्न. #Humanrights

Bhairav Diwase
0


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- मानवाधिकार सहायता स॑स्थान च॑द्रपूर जिल्हा कार्यकारिणी ची पहिली बैठक दिनांक 11जूलै रोजी च॑द्रपूर येथील शासकीय विश्रामगृहात ऊ उत्साहाच्या वातावरणात पार पडली.बैठकीच्या अध्यक्षस्थानी मानवाधिकार सहायता स॑स्थान महाराष्ट्र प्रदेश महासचिव श्री रवि धारणे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा अध्यक्ष श्री विनायक गरमडे, जिल्हा प्रमुख श्री अमोल बदखल, श्री अशोक पडगीलवार, आदी मान्यवर म॑चावर उपस्थित होते.
सर्व प्रथम पाहुण्यांचा परिचय व जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी यांचे पूष्प गुच्छ देवुन स्वागत केले.त्यान॑तर प्रास्ताविकात प्रा.अनील गर्गलवार यांनी प्रास्ताविकातून मानवाधिकार सहायता स॑स्थानची माहिती देवून पदाधिकारी यांनी कशाप्रकारे कार्य करावे याबाबत अधिक माहिती देवून उदाहरण द्वारे समजावून सांगितले.
त्यानंतर प्रदेश महासचिव श्री रवि धारणे, जिल्हा अध्यक्ष विनायक गरमडे, जिल्हा प्रमुख श्री अमोल बदखल, ॲड अशोक बावणे, यांनी उपस्थित पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन व प्रास्ताविक प्रा. अनिल गर्गलवार यांनी केले तर आभार प्रदर्शन अशोक पडगीलवार यांनी केले.बैठकीला स॑तोष क्षिरसागर, अशोक जथाडे, दुशा॑त लाटेलवार, गजानन कासर्लेवार, सौ.अणूताई निलमवार, सौ.बदखल ताई, अ फ्रोज पठाण, सुनील दैदावार, आदी उपस्थित होते.
#Humanrights

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)