प्रितीश कुंदावार यांचा वाढदिवस साजरा. #Celebration

Bhairav Diwase

पोंभुर्णा:- दिघोरी येथील काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच सामाजिक कार्यकर्ता प्रितीश कुंदावार यांच्या ४१ व्या वाढदिवसानिमित्त दिघोरी येथे नवयुवक गणेश मंडळाच्या वतीने झाडीपट्टीतील कलावंतांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वडसा येथील कोल्हापुरी डान्स ग्रुपच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
यावेळी दिघोरी येथील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान मित्र परिवारांनी कार्यक्रम स्थळी केक कापून प्रितीश कुंदावार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.