ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार. #Accident

मुल:- आज दी. 11नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास मुल गडचिरोली रोड वर आशिष फ्लाउड दुकाना समोर एका अपघातात ट्रक वाहन क्रं. CG. 08 Y 2011 च्या धडकेत एक व्यक्ती जागेवरच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव रतन मारोती तलांडे वय वर्षे 62 असुन ते सेवा निवृत्त पोलिस कर्मचारी असुन मुल येथील रहिवासी होते गाडी क्रमांक. MH 34 Z 3351 असुन गांधी चौक कडे जात असतांना ट्रक ने मागुण धडक दिलि धडक इतकी मोठी होती मि मृतकाचे शरीर पुर्ण छिन्नविच्छिन्न झाले मृतदेह ग्रामिण रूग्णालय मुल येथे मुल पोलिसांनी पाठवले असुन तपास मुल पोलिस करीत आहॆ.
धडक देणाऱ्या ट्रक चा ड्रायव्हर घटनास्थळवरून अटक केली असुन असून,मृत क हा ट्रक च्या चाकाखाली दबून छिन्नविच्छिन्न झाला. अपघाताच्या ठिकाणी रस्त्याची वाहतूक काही वेळ विस्कळीत झाल्याने संपूर्ण वाहतूक एकाच मार्गाने करावी लागली होती. अपघात घडल्याची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा घटनास्थळी पोहचली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत