नवाब मलिक यांच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून निषेध आंदोलन. #moment.


चंद्रपूर:- महाराष्ट्र सरकार मध्ये मंत्रीपदावर असलेले नवाब मलिक हे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून वारंवार जनतेची दिशाभूल करत आहे महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे प्रश्न, एसटी कामगार बांधवांचे प्रश्न, महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रश्न तसेच आत्ताच झालेल्या आरोग्य विभाग परीक्षेमध्ये महाराष्ट्र सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे विद्यार्थी त्रस्त झाले असे अनेक प्रश्‍न महाराष्ट्रात असताना सुद्धा त्या प्रश्नावर एकही मंत्री बोलायला तयार नाही परंतु लोकांचा या प्रश्नांकडे लक्ष जाऊ नये याकरिता लोकांची दिशाभूल करून महाविकास आघाडी सरकारमध्ये होत असलेले गैरव्यवहार नागरिकांपासून लपवण्याचे कार्य नवाब मलिक करीत आहे. याकरिता भाजपा युवा मोर्चा बल्लारपूर च्या माध्यमातून महाराष्ट्राचे लोकनेते विकास पुरुष लोकलेखा समिती अध्यक्ष मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज भैया अहिर व भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे यांच्या मार्गदर्शनात व भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांच्या नेतृत्वात आज नगरपरिषद चौकात अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात घोषणा करून निषेध नोंदविण्यात आला व बल्लारपूर तहसीलदार साहेब मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले वारंवार पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात काही ही बोलून महाराष्ट्रातल्या नागरिकांचे दिशाभूल करण्याचा प्रयत्न नवाब मलिक करत आहे व तसेच नवाब मलिक यांच्यावर काही देशद्रोहाचे आरोप सुद्धा करण्यात आले याची सखोल चौकशी व्हावी म्हणून युवा मोर्चा तर्फे आज आंदोलन करण्यात आले.

यावेळी प्रामुख्याने उपस्थित मिथिलेश पांडे जिल्हा महामंत्री भाजयुमो,संदीप पोडे जिल्हा उपाध्यक्ष, आदित्य शिंगाडे जिल्हा संयोजक सोशल मीडिया युवा मोर्चा, प्रतीक बारसागडे विद्यार्थी आघाडी महामंत्री, मनीष रमिल्ला, मोहित डंगोरे त्याच बरोबर अनेक युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आंदोलन घेण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत