दुर्गापूर भागात बिबट्याचे हल्ले सुरूच #chandrapur

Bhairav Diwase
संतप्त नागरिकांनी वनाधिकाऱ्यांना डांबले
चंद्रपूर:- शहरालगतच्या दुर्गापूर भागात बिबट्याच्या हल्ल्यात एक तीन वर्षीय मुलगी जखमी झाल्यानंतर मोठी तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांनी घटनास्थळी पोचलेल्या वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना डांबून ठेवल्याने परिस्थिती चिघळली होती.

बिबट्याच्या हल्यात 3 वर्षीय मुलगी गंभीर जखमी

चंद्रपूर शहरालगत दुर्गापूर येथे पुन्हा एकदा बिबट्याची दहशत बघायला मिळाली आहे. रात्री 9 च्या सुमारास वॉर्ड क्र. १ मध्ये अंगणात खेळत असलेल्या तीन वर्षीय मुलीवर बिबट्याने हल्ला केला. समोर बिबट्या मुलीला घेऊन जाताना पाहताच मुलीच्या आईने काठीने बिबट्याचा प्रतिकार करत त्याला पळवून लावले.
 जखमी अवस्थेतील आरक्षा जगजीवन पोप्पलवार हिला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संतप्त ग्रामस्थांनी या हल्ल्यानंतर घटनास्थळी पोचलेल्या वनपरिक्षेत्राधिकारी आणि पाच अन्य कर्मचाऱ्यांना एका घरात डांबले होते.