Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

ती, हळद आणि नंबर #number

हळदीत नाचता नाचता पडला मुलीच्या प्रेमात, असा दिला मोबाईल नंबर
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

सध्या लग्नसराईची धूम सुरु आहे. त्यामुळे लग्नाच्या आधी असणाऱ्या हळदी समारंभाची जोरदार चर्चा असते. धमाल, मस्तीसह नाचणं असं चित्र मांडवात पाहायला मिळतं. सोशल मीडियावर लग्नातील फोटो आणि व्हिडीओचा ढीग पाहायला मिळत आहे. या लग्नकार्यातच अनेकांचा बघण्याचा कार्यक्रम ठरतो किंवा लग्न जमतात. असं असताना सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. नाचता नाचता एक जण मुलीच्या प्रेमात पडतो. पुढे ओळख कशी वाढवणार यासाठी मोबाईल नंबर देण्याची धडपड सुरु होते. पण मोबाईल नंबर देणार तरी कसा? या साठी मुलगा एक शक्कल लढवतो. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हालाही हसू आवरणार नाही.
व्हायरल व्हिडीओत एक मुलगा बँडच्या ठेक्यावर नाचताना दिसत आहे. तितक्यात नाचता नाचता एका मुलीच्या प्रेमात पडतो. मग मोबाईल नंबर देण्यासाठी मुलगा एक युक्ती लढवतो. नाचता नाचता बोटांची आकडेमोड करत तिच्यापर्यंत नंबर पोहोचवतो. मुलगीही एक एक करत नंबर टाईप करून घेते आणि त्या नंबरवर कॉल करते. मग काय शेवटी नाचता नाचता फोन वाजतो आणि मुलगा बेभान होऊन नाचायला लागतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत