श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्यभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन.
https://www.adharnewsnetwork.com
Google ads.
राजुरा:- राजुरा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्यभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने स्वागत समितीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे ठरविले आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक जाणताराजांनी जुलमी, अत्याचारी व अन्यायी सत्तेच्या जोखडातून महाराष्ट्रातील अठरापगड जातीतील विश्वासू मावळ्यांना एकत्र करून जगाच्या इतिहासात एकमेवाद्वितीय असे न्यायाचे, सत्याचे, स्त्री सन्मानाचे समता व बंधुताचे वातावरण असणारे हिंदवी स्वराज्य निर्माण केले. स्वराज्य निर्माण करण्यात बारा बलुतेदारासह न्हावी, मुसलमान, शिंपी, चांभार, कुंभार, माळी, शेतकरी, शेतमजूर, परीठ, लोहार, सोनार, मराठा, कुणबी, तेली अश विविध जाती-धर्मातील बांधवांनी स्वराज्य रक्षणार्थं आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यांचे हौतात्म्य, बलिदान, त्याग, समर्पण इत्यादी चिरकाल स्मरणात राहावे व नवीन पिढीने हा आदर्श समोर ठेवून स्वाभीमानाने जीवन जगावे. महाराजांचा आदर्श सर्वसामान्यांचे जीवन आजही बदलवून एक आदर्श समाज निर्माण करण्यात सक्षम आहेत, म्हणून समाजातील विविध क्षेत्रात जसे- कृषी, शिक्षण, समाज सेवा, आरोग्य, स्पर्धा परीक्षा इत्यादी उत्कृष्ठ कार्य करीत असलेल्या मान्यवरांचा तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार करण्याचा स्वागत समितीचा हेतू आहे.
३५० वा शिवराज्यभिषेक सोहळा वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करून साजरा करण्यात येणार आहे. याची सुरूवात शिवराज्यभिषेक (तिथी) दिनापासून (२ जून) च्या उद्घाटकीय कार्यक्रमापासून होणार आहे. हंसराजजी अहिर, अध्यक्ष, राष्ट्रीय मागसवर्गीय आयोग यांच्या हस्ते होणार आहेत. तर या कार्यक्रमात नाविन्यपूर्ण शेती व्यवसाय करणारे तसेच महिला शेतकरी, अठरापगड जाती आधारीत व्यवसाय करणारे जेष्ठ मंडळीचा, समाजातील सामाजिक कर्तव्य पार पाडणारे व्यक्ती, सामाजिक कार्यातील युवक, १० वी व १२ वी पास गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, विविध स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार राजुरा- जिवती कोरपना-गडचांदूर इत्यादी ठिकाणी शिवचरित्रावर व्याख्यानमाला, युवा महोत्सवात सांस्कृती स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, निबंध स्पर्धा, मॅराथॉन स्पर्धा, शेतकऱ्यांना बि-बियाण्याचे वाटप, जिवती येथील स्थापन केलेल्या शिवस्मारक समितीच्या सदस्यांचा सत्कार असे विविधांगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून या सर्व उपक्रमाचा हेतू जगातील लोकशाही तत्वाचे, रयतेचे राज्य निर्माण करणारा जगातील एकमेव राजा यांचे शेतकरी, शेतमजूर, स्वी सन्मानाचा धोरणाची जाण ठेवून शिवराज्यभिषेक सोहळा समितीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. तरी सर्व समाजबांधवानी शुक्रवार दिनांक २ जून २०२३ ला सकाळी १०.०० वाजता अॅड. यादवराव घोटे स्मृती महाविद्यालय, बस स्टॅन्ड जवळ, राजुरा येथे उपस्थित रहावे असे आवाहन स्वागत समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे.
पत्रकार परिषदेला ऍड. संजय धोटे, माजी आमदार राजुरा, अविनाश जाधव, सचिव, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा, सतीश धोटे, विनायक देशमुख, दिलीप वांढरे, राधेश्याम अडानिया, महादेव तपासे, संदीप गायकवाड आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन बादल बेले यांनी केले तर आभार दिलीप वांढरे यांनी मानले.