बहिणीला आक्षेपार्ह मॅसेज करून फोटो व्हायरल करणाऱ्या युवकाची भावाकडून हत्या #chandrapur #nagpur #murder

Bhairav Diwase
0

नागपूर:- बहिणीला नको तसे मॅसेज पाठवून तिचे फोटो प्रसारित करणाऱ्या युवकाची भावाने काठीने वार करून हत्या केली. ही घटना गिट्टीखदान पोलिस हद्दीतील गंगानगर येथे मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. कपिल भीमराव डोंगरे (३७) असे मृताचे तर राहुल असे आरोपीचे नाव आहे.

राहुल हा बांधकामाचे कंत्राट घेणाऱ्याकडे काम करतो. तर कपिल याची मोबाइल शॉपी आहे. गेल्या काही दिवसांपासून कपिल हा राहुलच्या बहिणीला नको तसे मॅसेज पाठवायचा. हे कळताच राहुल याने कपिलला अनेकदा समजाविले. तिचे फोटोही प्रसारित केले. मंगळवारी दुपारी कपिल हा त्याच्या दुकानात होता.

राहुल दुकानात गेला. दोघांमध्ये वाद झाला. कपिल याने राहुलला काठीने मारहाण केली. राहुलने त्याच्या हातातील काठी हिसकावली व कपिलच्या डोक्यावर वार केले. यात कपिलचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर राहुल याने गिट्टीखदान पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. घटनेची माहिती मिळताच गिट्टीखदान पोलिसांचा ताफा गंगानगर येथे पोहोचला. पंचनामा करून मृतदेह मेयोत पाठवला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)