सुधीर मुनगंटीवार 26 मार्चला दाखल करणार उमेदवारी अर्ज #chandrapurloksabha #chandrapur

Bhairav Diwase
चंद्रपूर:- भाजपकडून 13 मार्चला लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा निर्वाचन क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचे वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. भाजपा चे चंद्रपूर लोकसभा उमेदवार सुधीर मुनगंटीवार 26 मार्च ला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.


छत्रपती शिवाजी महाराज चौकातून कार्यकर्ते व नागरिकांच्या भव्य उपस्थिती मध्ये नामांकन रॅली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचणार त्यानंतर सुधीर मुनगंटीवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.


लोकसभा नामांकन मंगळवारी सकाळी 11 वाजता सुधीर मुनगंटीवार वणी-आर्णी व चंद्रपुरातील दिग्गज भाजप नेत्यांच्या उपस्थिती मध्ये लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. पहिल्या टप्प्यात होणाऱ्या चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या या हंगामात अनेक मोठे नेते व सेलिब्रिटी सुद्धा चंद्रपुरात प्रचाराला येणार असल्याची माहिती आशीर्वचन सभेमध्ये मुनगंटीवारांनी दिली.