चंद्रपूर:- ॲड. राजेंद्र महाडोळे यांचा वणी आर्णी चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना पाठिंबा दिला आहे.
महाडोळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर त्यांना ओबीसी मोर्चाचे पद देण्यात आले. आज राजेंद्र महाडोळे यांनी आपल्या समर्थकांसह ओबीसी, एससी, एसटी मेळाव्याचे आयोजन केले. यावेळी भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना जाहीर समर्थन दिल्याचे जाहीर केले. यावेळी बोलताना मुनगंटीवार यांनी महाडोळे आल्याने वंचीतचे मते ही भाजपला मिळतील असे वक्तव्य केले.
कोण आहेत ॲड. राजेंद्र महाडोळे
विदर्भातील ओबिसी चे नेते, मागील वीस वर्षापासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणारे ॲड.राजेंद्र महाडोळे चंद्रपूर 2019 मध्ये वंचित कडून चंद्रपूर लोकसभा निवडणूक लढवून प्रचंड मताधिक्य मिळवले होते.
पत्रकार परिषद:- https://www.youtube.com/live/PKAuy46NHFQ?si=xLUhtXIWnKsW7iWj