Top News

लव-जिहादच्या नावाखालील व्हायरल व्हिडीओ शेअर करू नका:- जिल्हा पोलीस#lovejihad #socialmedia #viralvideo #Chandrapurpolice


संग्रहित छायाचित्र
चंद्रपूर:- काही दिवसापूर्वी सोशल मिडीया माध्यमावर लव जिहाद च्या नावाखाली एका युवतीचा व्हिडीओ वायरल होत असुन सदर बाबतीत चंद्रपूर जिल्हा पोलीसांनी संबंधीत युवतीचे तक्रारीवरुन संबधीत आरोपीविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करुन कायदेशीर कार्यवाही केलेली असुन गुन्हयाचा तपास सुरु आहे.

तरी, या द्वारे सर्व नागरीकांना कळविण्यात येते की, नमुद लव जिहाद च्या नावावरील वायरल होत असलेला सदर व्हिडीओ ज्यांच्या कडे आले असल्यास त्यांनी सदर व्हिडीओ तात्काळ डिलीट करावेत. सदर व्हिडीओ व्हॉट्सॲप, इंन्स्टाग्राम, फेसबुक व इतर सोशल मिडीया माध्यामाद्वारे इतरांना शेअर करु नये व जातीय तणाव निर्माण करु नये. सदर प्रकरणी पोलीसांनी योग्य कायदेशीर कार्यवाही केलेली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने