चंद्रपूर:- आज दिनांक 2 एप्रिल 2024 ला सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ अभिलाषा गावतुरे व डॉ राकेश गावतुरे यांनी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नामदार नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी काँग्रेस किसान सेल चे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील वाढई तसेच सचिव विक्रमजी गुरनुले हे सुद्धा उपस्थित होते.
गावतुरे दाम्पत्यांचा पक्ष प्रवेशा मुळे चंद्रपूर जिल्हा काँग्रेस मध्ये नवीन उत्साह निर्माण झाला आहे, गावतुरे दाम्पत्याच्या काँग्रेस प्रवेशाने चंद्रपूर लोकसभेतील समीकरणे नक्कीच बदलतील अशी आशा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पल्लवित झाली आहे.