चंद्रपूर:- घुग्घुस काँग्रेस शहराध्यक्ष राजुरेड्डी यांच्या घरावर रात्री आठ वाजताच्या अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याच्या घटनेने शहरात दहशत माजली आहे.
काँग्रेस अध्यक्ष हे घराबाहेरून मोबाईल वर बोलता - बोलता घराच्या आत गेले असता जोरदार आवाज आला त्यांचे भाडेकरू घरातून बाल्कनीत कशाचा आवाज आला पाहायला आले असता त्याठिकाणी बंदुकीची गोळी पडल्याचे लक्षात आले रेड्डी यांनी घटनेची माहिती पोलीस स्टेशनला दिली असून पोलीस तपास करीत आहे.
गोळीबारानंतर परिसरात तणावाचे वातावरण
घुघुस काँग्रेस शहराध्यक्ष राजुरेड्डी यांच्या घरावर रविवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याने घुघुस शहरात खळबळ उडाली आहे. रेड्डी घरी हजर असताना रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात कोणीही मारले गेले नसले तरी गोळीबारानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनास्थळी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात
घटनेची माहिती मिळताच घुग्घुस पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. गोळीबारादरम्यान रेड्डी यांच्या घराच्या वरच्या मजल्यावरील गॅलरीत एक काडतूस सापडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या हल्ल्याची माहिती मिळताच राजुरेड्डी यांच्या समर्थकांची त्यांच्या घराबाहेर मोठी गर्दी झाली, त्यामुळे वातावरण अधिकच तापले.