चंद्रपूर:- सन 2025-26 चा अर्थसंकल्प हा राज्यातील सर्वच घटकांना फसविणारा आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा नाही. लाडक्या बहिणींना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता नाही. केवळ घोषणा करुन सर्वच घटकांची दिशाभुल केलेली आहे. मोटर वाहनांवरील कर वाढवून सामान्यांची देखील हे सरकार दिशाभुल करीत आहे. शेतकरी शेतमजूर तसेच उद्योगांजकांनासाठी हा निराशाजनक अर्थसंकल्प आहे.