Click Here...👇👇👇

Chandrapur police: सराईत गुन्हेगार घरफोडी प्रकरणी अटक, 1.54 लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चंद्रपूर शहरात मालमत्तेविरूद्ध गुन्ह्यांना प्रतिबंध करून दाखल गुन्हे उघडकीस आणणेबाबत पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी रामनगर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी असिफराजा शेख यांना सूचना व मार्गदर्शन केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक श्री. असिफराजा शेख यांनी पोलीस स्टेशन रामनगरचे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांना जबरी चोरी, घरफोडी करणारे चोरांबाबत गोपनीय माहिती काढून चोरीचे गुन्ह्यांची उकल करण्याबाबत आदेशीत केले होते.

त्यानुसार रामनगर पोलीस स्टेशनच्या शोध पथकातील अधिकारी व अंमलदार पो.स्टे. रामनगर येथे दाखल अपराध क्र. ५२७/२०२५ कलम ३३१ (३) ३३१(४) ३०५ भा.न्या.सं. मधील घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना गोपनीय माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी मोहम्मद सरफरोज सागीर शहा उर्फ शुटर, वय 24 वर्षे, धंदा मजुरी. रा. आमटे ले आऊट, रयतवारी कॉलनी, चंद्रपूर यांनी केले आहेत. त्यानुसार त्यांचा शोध घेण्यासाठी त्याचे मागावर राहून त्याचे हालचालींवर लक्ष ठेऊन तो चोरीचा मुद्देमाल कब्जात घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती प्राप्त होताच त्यास रंगेहात ताब्यात घेऊन त्याचे कब्जातून तसेच त्याचे सांगण्याप्रमाणे त्याने विल्हेवाट लावलेले सोन्याचे दागिने असात एकूण १,५४,०००/- रूपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले आहेत. आरोपीकडे विचारपूस चालू असून त्याचेकडून अशाच प्रकारचे अन्य अपराध उघडकीस येण्याची शक्यता आहे.

वरील कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री. मुमक्का सुदर्शन व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुधाकर यादव यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक असिफराजा शेख, सहा. पोलीस निरीक्षक देवाजी नरोटे, सहा. पोलीस निरीक्षक हनुमान उगले, स.पो.नि. निलेश वाघमारे, पोलीस अंमलदार शरद कुडे, आनंद खरात, लालू यादव, पेतराज सिडाम, प्रशांत शेंदरे, जितेंद्र आकरे, बाबा नैताम, मनिषा मोरे, रविकुमार ढेंगळे, संदिप कामडी, पंकज ठोंबरे, प्रफुल पुप्पलवार, सुरेश कोरेवार, ब्ल्युटी साखरे यांनी केली आहे.