Click Here...👇👇👇

Rajya Sabha Nomination: निकम, मास्टर, श्रृंगला अन् जैन; राष्ट्रपती कोट्यातून 4 जणांची राज्यसभेवर निवड

Bhairav Diwase

नवी दिल्ली:- ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे. राष्ट्रपती कोट्यातून उज्ज्वल निकमांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आली. उज्ज्वल निकम यांच्यासोबतच सी. सदानंदन मास्टर, हर्षवर्धन श्रृंगला आणि डॉ. मीनाक्षी जैन यांनाही राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर संधी मिळाली आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेचे नामांकित सदस्य म्हणून चार प्रतिष्ठित (The President of India Rajya Sabha Nomination) व्यक्तींची नियुक्ती केली आहे. भारतीय संविधानाच्या कलम 80(1)(a) अंतर्गत या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे देशाच्या कायदेमंडळात विविध क्षेत्रातील तज्ज्ञता आणण्याची संधी मिळते. या चार नावांमध्ये कायदा, परराष्ट्र धोरण, शिक्षण आणि इतिहास अशा विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे.