Chandrapur News: स्थानिक गुन्हे शाखेचा ऑनलाईन बुकींवर "सर्जिकल स्ट्राईक"; ६० हजारांचा मुद्देमाल जप्त

Bhairav Diwase
राजुरा:- सध्या सुरू असलेल्या टी-२० वर्ल्ड कपमधील सामन्यांवर ऑनलाईन जुगार खेळणाऱ्यांविरुद्ध चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने कंबर कसली आहे. दि. २३ फेब्रुवारी रोजी राजुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत छापा टाकून, झिम्बाब्वे विरुद्ध वेस्ट इंडिज या सामन्यावर सट्टा लावणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


नेमकी घटना काय?

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की, राजुरा येथील महात्मा फुले हायस्कूलच्या गेटसमोर काही व्यक्ती मोबाईलवर ऑनलाईन जुगार खेळत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून श्रेयस सातपुते याला रंगेहाथ पकडले. त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता, तो झिम्बाब्वे विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यावर पैशांची देवाणघेवाण करून जुगार खेळत असल्याचे निष्पन्न झाले.


आरोपी आणि जप्त मुद्देमाल:

या कारवाईत पोलिसांनी जवाहर नगर येथील श्रेयस पंढरी सातपुते (१९) आणि देशपांडे वाडी येथील सुजल मुक्तेश्वर वाढई (२१) या दोघांना आरोपी बनवले आहे. त्यांच्याकडून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे:
  • दोन मोबाईल फोन: किंमत ६०,००० रुपये.
  • ऑनलाईन स्क्रीनशॉट्स: जुगाराच्या व्यवहाराचे पुरावे.

कायदेशीर कारवाई:

या दोन्ही आरोपींविरुद्ध राजुरा पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्र. २८१/२६, कलम १२(A) महाराष्ट्र जुगार कायदा सहकलम ४९ (BNS) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर आणि उपविभाग राजुरा-गडचांदूर पथकाने यशस्वीपणे पार पाडली.