चंद्रपूर:- रुपाली चाकणकर यांचा राजीनामा म्हणजे केवळ पायउतार होणे नाही, तर ती एक हकालपट्टी आहे! खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर सुषमा अंधारे यांनी चंद्रपुरातून राज्य सरकारवर तोफ डागली आहे.
"तो राजीनामा नाहीच आहे. तो मनाने दिलेला नाही. जेव्हा सगळ्यांनी सांगावं लागतं आता तुमची गरज नाही, आता तुम्ही निघा, तेव्हा त्या पायउतार झाल्या आहेत. केवळ राजीनामा पुरेसा नाही, तर यांच्यावर गुन्हा दाखल करून सहआरोपी केलं पाहिजे!
अंधारे पुढे म्हणाल्या की, चाकणकर यांची नार्को टेस्ट करावी. यामध्ये प्रशासकीय स्तरावरील अनेक 'मोठे मासे' अडकण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

