चंद्रपूर:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त काढण्यात आलेल्या रॅलीदरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेत रविकांत टेंभुरकर नामक एका युवकाची हत्या झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या विद्यार्थी आघाडी महानगरच्या वतीने पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात संबंधित आरोपींना कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी शहरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचीही मागणी करण्यात आली.
भाजप विद्यार्थी आघाडीचे महानगर जिल्हाध्यक्ष प्रलय म्हशाखेत्री यांनी सांगितले की, रॅलीसारख्या शांततापूर्ण कार्यक्रमात अशा प्रकारची हिंसक घटना घडणे अत्यंत दुर्दैवी आहे. पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.
दरम्यान, या घटनेनंतर चंद्रपूर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे.पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. यावेळी भाजप विद्यार्थी आघाडी चे महानगर जिल्हाध्यक्ष प्रलय म्हशाखेत्री, जिल्हा महामंत्री आदर्श लाडसकर, साई कोटा, उत्कर्ष सोनटक्के,कृष्णा टावरी,अनिकेत भरणे व इतर उपस्थित होते.


