चंद्रपूर:- चंद्रपूरची हवा आता विषारी झाली आहे का? असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी जेव्हा चंद्रपूरच्या औद्योगिक पट्ट्याचा दौरा केला, तेव्हा त्यांच्या स्वतःच्या गाडीवर साचलेल्या राखेच्या थराने प्रदूषणाची भीषणता जगासमोर आणली.
पाहणी दरम्यान पंकजा मुंडे यांनी आपला मोर्चा गुप्ता पॉवर प्लांटकडे वळवला. तिथे गेल्यानंतर प्रदूषणाची परिस्थिती पाहून त्यांनी संताप व्यक्त केला. केवळ पाहणी करून त्या थांबल्या नाहीत, तर स्टेजवर उपस्थित असलेल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) अधिकाऱ्यांना त्यांनी सर्वांसमोर खडे बोल सुनावले.
आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीही विधानसभेत हा प्रश्न लावून धरला होता. त्याचीच दखल घेत पंकजा मुंडे यांनी आता १ वर्ष आणि ३ वर्षांचा विशेष 'रोडमॅप' तयार केला आहे. फॉगर्स आणि डस्ट सप्रेशन सिस्टीम न बसवणाऱ्या कंपन्यांवर आता थेट कारवाई करण्याचे संकेत मंत्र्यांनी दिले आहेत.


