Mul News: वीज वाहिनीवरील वेल काढणे पडले महाग

Bhairav Diwase
विजेच्या धक्क्याने एक व्यक्ती गंभीर जखमी!
मुल:- मुल तालुक्यातील नांदगाव येथे मुख्य विद्युत वाहिनीवरील तारांवर चढलेला वेल ओढण्याचा प्रयत्न करताना एका ज्येष्ठ नागरिकाला विजेचा धक्का बसून ते गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी (दि. २६) दुपारी सुमारे ४ वाजता घडली. रामदास कान्हुजी उमक (वय ६५), रा. नांदगाव (मूल) असे जखमीचे नाव आहे.


नांदगाव येथील अल्लीवार यांच्या गोदामाच्या आवारालगत मुख्य विद्युत वाहिनीवर वेली चढल्या होत्या. त्या काढण्यासाठी रामदास उमक यांनी वेल ओढण्याचा प्रयत्न केला. यावेळी वेल विद्युत तारांच्या संपर्कात आल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. घटनेनंतर त्यांना उपचारासाठी चंद्रपूर येथे दाखल केले.