गळफास घेऊन इसमाची आत्महत्या.

Bhairav Diwase
कामाची मजूरी मिळत नव्हती म्हणून केली आत्महत्या.

राजीव गांधी कामगार झोपडपट्टी (फुकट नगर ) येथील घटना.
Bhairav Diwase. Oct 11, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- शहरातील राजीव गांधी कामगार झोपडपट्टी (फुकट नगर ) येथे आज सकाळी एका इसमाने नॉयलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सकाळी उघडकीस आली. मृतक व्यक्तीचे नाव जयेश पडोळे (वय अंदाजे 30 ) असून हा व्यक्ती चंद्रपूर जिल्ह्यातील कृष्ण नगर येथे राहत होता. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मृतक इसमा वरती कर्ज होते. मृतक इसम हा (फुकट नगर) मध्ये एका व्यक्तीच्या घरी मागील काही दिवसांपासून पेंटिंग चे काम करीत होता. ज्यांच्या घरी पेंटिंग चे काम चालू होते. त्या घर मालकांनी पेंटिंगचा कामाचे पैसे देत नव्हता, मृतक व्यक्ती वरती कर्जाचे डोंगर होते. म्हणून मृतक जयेश पडोळे या व्यक्तीने फुुकट नगर येथील पेंटिंगचे काम करीत असलेल्या घरमालकाच्या नवीन घरी रात्रीच्या सुमारास नायलॉनच्या दोरीने गळपास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळी रामनगर पोलीस दाखल झाले पुढील तपास सुरू आहे.