वेकोली कोळसा खाणीत कार्यरत असलेले राजकीय पक्षाचे नेते हजेरी लावुन घरी.

Bhairav Diwase
अश्या कामचुकार कामगार नेत्यामुळे वेकोली खाणीचे नुकसानीत.
 Bhairav Diwase. Oct 10, 2020
 (आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- घुग्घुस येथुन जवळच असलेल्या वेकोली वणी क्षेत्राच्या निलजई व नायगांव कोळसा खाणीचे कामगार सकाळी हजेरी लावतात व एक ते दोन तास थातुरमातुर काम करुन आपल्या घरी परत येतात.

घुग्घुस येथे राहनारे अनेक कामगार व कामगार संघटनेचे नेते सकाळी कामावर जातात व हजेरी लावुन एक ते दोन तासांनी घरी परत येतात.
८ तास काम करने बंधन कारक आहे परंतु घुग्घुस येथील काही कामगार संघटनेचे नेते फक्त दोन तास काम करुन घरी परत जातात व दिवस भर राजकारणात व्यस्त असतात किंवा मद्यपान करण्यासाठी बाहेर जातात.

वेकोलीच्या खाणी नुकसानीत आहे अश्या कामचुकार कामगार नेत्यामुळे. अश्या कामचुकार कामगार संघटनेच्या नेत्यांवर व कामगारांवर वेकोली व्यवस्थापनाने कारवाही करणे गरजेचे आहे.