घुग्घुस येथील बचत गटांचे आत्मनिर्भर भारत योजनेतून सक्षमीकरण करणार.

Bhairav Diwase

विवेक बोढे भाजपा शहराध्यक्ष घुग्घुस यांचे प्रतिपादन.
Bhairav Diwase. Oct 10, 2020
(आधार न्यूज नेटवर्क शहर प्रतिनिधी) पंकज रामटेके, घुग्घुस
चंद्रपूर:- घुग्घुस येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना "आत्मनिर्भर भारत अभियान" हि महिला बचत गटांचे सक्षमीकरण करण्यासाठी मा. आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव दादा भोंगळे यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात येनार आहे असे प्रतिपादन घुग्घुस भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे यांनी केले आहे.

१२ मे २०२० ला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियान योजनेची घोषणा केली. त्यामुळे भारतातील कोट्यावधी नागरिकांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी व कोरोना वायरसशी लढण्यात सक्षम बनविण्यासाठी आत्मनिर्भर योजनेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी २० लाख कोटी रुपयाचे पँकेज जाहिर केले आहे. टाळेबंदीच्या काळात बंद पडलेले छोटे व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी केंद्र सरकारने हि योजना आनली आहे.

भारतीय जनता पार्टी घुघुस नेहमी बचत गटातील महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी कार्य करत असते. आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत लघु कर्ज बचत गटांना उपलब्ध करून देण्यात येईल. बचत गटांना खाद्यपदार्थ व विविध प्रकारच्या वस्तू तयार करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येईल. या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी स्टॉल सुद्धा उभारण्यात येईल. बचत गटांसाठी स्टॉल उभारणीचा सर्व खर्च जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे हे करणार आहेत.

पथविक्रेत्यांवर व छोट्या व्यवसायिकांवर टाळेबंदीच्या काळात अडचणीची वेळ आली आहे. महिलांनी घरी वस्तू तयार करून बाजारात विकल्यास कुटुंबाला आर्थिक आधार होऊ शकतो असे विवेक बोढे यांनी सांगितले.