महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ तालुका सावली तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन.

Bhairav Diwase
दि. 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते 2 वा. रक्तदान शिबीराचे आयोजन.
Bhairav Diwase. Oct 13, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ तालुका सावली च्या वतीने धम्म चक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून सावली येथे दि. 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते 2 वा. रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे.
कोविड - 19 या संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे सरकारी रक्त पेढी मध्ये रक्त साठा कमी असल्याने रक्ताची निकड लक्षात घेता व रक्तदान हे श्रेष्ठ दान हे उद्दिष्ट समोर ठेऊन महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. तरी इच्छुक रक्तदात्यानी या महा दानास सहकार्य करावे असे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल स्वामी यानी केले आहे.